आदिनाथवर उद्या ऊस उत्पादक व केळी उत्पादक शेतकरी मार्गदर्शन मेळावा होणार..

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.11: उद्या रविवारी (ता.12) आदिनाथ सहकारी साखर कारखाना व सुवर्ण कृषी तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमानाने ” ऊस उत्पादक व केळी उत्पादक शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे ” आयोजन केले आहे. यावेळी करमाळा, माढा, टेंभुर्णी परांडा,पंचक्रोशीतील ऊस उत्पादक व केळी उत्पादक शेतकरी यांनी उपस्थित रहावे असे अवाहन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व सेवाभावी समन्वयक व्यवस्थापक सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र पंढरपूर व बार्शी चे नानासाहेब कदम यांनी केले आहे.
याबाबत जादा माहिती देताना ते म्हणाले की ,सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान द्वारा अल्प खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन नवीन लागन व खोडवा जोपासना तसेच सुवर्ण कृषी तंत्रज्ञान माध्यमातून दर्जैदार केळी उत्पादन काढले जाते. यासाठी ऊस व केळी संशोधक शास्त्रज्ञ प्रा.डॅ. अमोल पाटील रसायनशास्त्र हे मार्गदर्शन करणार आहेत. मक स्वतः काही अनुभव कथन करणार आहे. यावेळी सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र पंढरपूर व बार्शी व ऊस उत्पादक पालक योजना व सुवर्ण ऊस मास्टर ट्रेनर निर्माण योजनांची चर्चा होणार आहे. हा मेळावा १२ फेब्रुवारी वार रविवार वेळ १ ते ४ स्थळ आदिनाथ सहकारी साखर कारखाना व ४ते ५ शिवार फेरी व प्रात्यक्षिक शेलगाव येथे एम.डी. हरीदास डांगे यांचे शेतात दाखवले जाणार आहे. याचा लाभ घ्यावा असे अवाहनही श्री. कदम यांनी केले आहे.