करमाळा कृषी विभागामार्फत ११ ऑगस्टला रानभाजी महोत्सव - नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन - Saptahik Sandesh

करमाळा कृषी विभागामार्फत ११ ऑगस्टला रानभाजी महोत्सव – नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळा यांचेवतीने करमाळा शेतशिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या/रानफळे यांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरीकांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी येथील पंचायत समिती सभागृह येथे सकाळी १० वा रानभाजी महोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सदर रानभाजी महोत्सवामध्ये जे शेतकरी रानभाज्या विक्री करण्यास इच्छुक आहेत त्यांची माहिती उद्या (ता.१०) पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास कळवावीत असे आवाहन कृषीविभागामार्फत करण्यात आले आहे. सदर रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशके फवारणी करण्यात येत नाही. शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

रानभाजी महोत्सवा मध्ये भाग घेणाऱ्या लाभार्थींना कृषि विभागाचेवतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा असे कृषि विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.


आपल्या भागात येणाऱ्या काही रानभाज्याची नावे –
१. कडवंची २. तांदुळजा ३. चिघळ ४. माठ ५. कुंजीर ६. हादगा ७. अळू ८. पाथरी
९. उंबर फळे १०. शेवग्याची पाने ११. सराटा १२. कुरडू १३. आघाडा १४. केना
१५. खापरखुटी १६. गुळवेल १७. कपाळफोडी १८. भुई आवळा १९. पिंपळाची पाने २०. टाकळा / कास्वद

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala
Keywords : RanBhaji Mahotsav 2022 | Karmala solapur news | Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!