'चिन्ह गेले, पक्ष गेला' हा इतिहास जुनाच आहे - Saptahik Sandesh

‘चिन्ह गेले, पक्ष गेला’ हा इतिहास जुनाच आहे

Jagmohan reddi shivsena

शिवसेना पक्ष सध्या संकटात सापडला आहे. निवडणूक आयोगाने त्यांचे पक्ष व चिन्ह गोठवले आहे. त्याचा वापर ना ठाकरे गट ना शिंदे गट करू शकणार आहे.

काय महाराष्ट्रात पण होऊ शकते आंध्र प्रदेशची पुनरावृत्ती?

2009 मध्ये विमान अपघाताल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे निधन झाले. त्याकाळात रेड्डी यांची लोकप्रियता फार मोठी होती. वायएसआर रेड्डी यांच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न पुढे आला होता. त्यांची बायको आमदार होती. मुलगा जगमोहन रेड्डी खासदार होता. सहानभूतीच्या लाटेबर जगनमोहन यांना मुख्यमंत्री करावे असे रेड्डी यांच्या समर्थकांना वाटत होते. परंतु काँग्रेसने जगनमोहन यांना सत्तेपासून दूर ठेवले. सोनिया गांधी यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या आई सोबत भेटही नाकारली.
३८ वर्षाचे जगनमोहन आंध्र प्रदेशच्या झंझावती दौऱ्यावर गेले. जगजमोहन राज्यभर फिरले त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

दोन्ही मायलेकराने काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. आईने आमदारकी तर जगनमोहन यांनी खासदारकी सोडली. 2011 मध्ये जगनमोहन यांनी ‘वायएसआर’ नावाचा नवा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. मायलेकरे दोन्ही निवडणुकीत जिंकले. तेव्हा ते आंध्र प्रदेश च्या हितासाठी लढणारे एकमेक नायक ठरले.

2014 मध्ये वायएसआरची सत्ता आली नाही पण काँग्रेसची सत्ता मात्र गेली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जगनमोहन यांनी इतिहास रचत 175 पैकी 157 जागा जिंकल्या.

हे झाले शेजारील राज्यातील परंतु महाराष्ट्रात पण सध्या उद्धव ठाकरे यांच्या समोर अशीच परिस्थिती आहे. स्वतःच्या जवळच्या मित्राने घात केला. स्वत:च्या बापाचा पक्ष असूनही, मित्र पक्षावर हक्क सांगू लागला. जगनमोहन एकटे लढले. उद्धव ठाकरे यांचा मुलगा माजी मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत आहे. एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. आदित्य ठाकरे होतील काय महाराष्ट्राचे हिरो? दोन्ही पितापुत्र मिळून बाळासाहेबांची शिवसेना पूर्वीसारखी बनवतील का? कश्री उद्धव व आदित्य दोघ मिळून महाराष्ट्रामध्ये झंझावात दौरे करतील का? बाळासाहेबां प्रमाणे लोकप्रियता मिळवतील का? उद्धव ठाकरे रामराज्य निर्माण करतील का?हा येणारा काळाच ठरवेल.

✍️ तुषार तळेकर, केम (ता. करमाळा) मो.9405203897

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!