मरावे परी किर्ती रुपी उरावे..

सांगवी गावचे माजी सरपंच सूर्यभान हिवरे (नाना) यांचे दि.7/6/2023 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे जन्म म्हटलं की मृत्यू हा ठरलेलाच असतो.पण म्हणतात ना मरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्याप्रमाणे नानांनी आपलं अख्ख आयुष्य गोरगरीब दीनदुबळ्या जनतेची सेवा करण्यात घालवलं. नानांनी आयुष्यात सर्व काही भोगल अनुभवलं पद पैसा प्रतिष्ठा सर्व काही जवळ असताना याच्यातल्या कुठल्याही गोष्टीचा नानांनी कधीही गर्व केला नाही. घमंड केला नाही.
नाना म्हणलं की आमच्या डोळ्यासमोर एक साध सरळ मनमिळावू आणि मायाळू असं एक व्यक्तिमत्व आपोआप उभा राहतं नाना हे सांगवी गावचे सरपंच झाले पण जवळपासच्या गावात म्हणण्यापेक्षा नानांनी आपल्या कार्याच्या कर्तुत्वाच्या जोरावर आपल्या नावाचा ठसा करमाळा तालुक्यातल्या प्रतेक गावात उमटवला होता नाना आज तुमच्या जाण्याने हिवरे परिवारातच नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण ज्यावेळेस तुम्ही केलेल्या कामाची कार्याची तुमच्या साध्या सरळ स्वभावाची चर्चा होते त्यावेळेस ती पोकळी आपोआप भरून निघते.
या सगळ्या वरून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते कि मरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्याची प्रचिती आज तुमच्या केलेल्या कार्यातून समोर येते नाना तुमचं नाव आणि तुम्ही अडचणीच्या काळात गोरगरीब दीनदुबळ्या सर्वसामान्य माणसाची जी मदत केली आहे सेवा केली आहे ती कायम आमच्या आठवणीत राहील नानांनी काम करत असताना गरीब श्रीमंत लहान मोठा जवळचा लांबचा असा कधीही भेदभाव केला नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता हीच नानांची ताकत राहिली आहे नाना तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं सामाजिककार्य तुमचं दातृत्व तुमचं कर्तुत्व या सर्व अविस्मरणीय गोष्टी आहेत नाना आज तुम्ही आमच्यातून निघून गेला हे जरी खरं असलं तरी तुम्ही तुमच्या कार्याच्या कर्तुत्वाच्या रूपाने कायम आमच्या आठवणीत रहाल परत एकदा तुमच्या कार्याला मनापासून सलाम करतो आमच्या पांगरे ग्रामस्थांच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हिवरे कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो. ✍️ बाळासाहेब गुटाळ, पांगरे, तालुका करमाळा,मो. 9049904978