अशीही चलता चलता मदत करता येते
नाशिकला स्वामी सदगुरू महाराज यांच्या वतीने विश्व शांती यज्ञ करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले गेले होते. मी तो कार्यक्रम करून परत येत असताना नाशिक ते मनमाड रेल्वेमार्गाने मनमाड ला आलो व तिथे आल्यावर मी मनमाड ते दौंड टिकट काढले व मी महाराष्ट्र एक्स्प्रेसची वाट पाहत होतो.
त्या वेळी मला एक मुलगी बऱ्याच लोकांना मोबाईल फोन मागत असताना दिसली, पण तिला कोणीही मदत करायला तयार नव्हते. मग ती माझ्याकडे आली.मला तिने फोन मागितला मी तिला नंबर विचारला आणि तो फोन लावला. ती मुलगी तिच्या वडिलांशी बोलु लागली व रडू लागली. मी तिला म्हणालो रडू नको काय झाले आहे ते सांग मी. तुझी मदत करतो.
मी तिच्या वडीलांशी बोललो आणि व्यवस्थीत सांगितले की तुमची मुलगी येथे मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानकावर आहे. तुम्ही येथे या आणि तूमच्या मुलीला घेऊन जा. तर ते मला म्हणाले मला शक्य नाही तुम्हीच घेऊन या तिला.
तिचं नाव वंदना वर्मा आहे असे तिने मला सांगितल होत. मी त्या मुलीची परीस्थिती पाहून तिला लगेच मदत करण्याचे ठरवले कारण रेल्वेच्या स्थानकावरती काही गुंड मवाली लोक तिच्यावर नजर लावूनच होते. कारण अशा परीस्थितीची हे लोक वाट पाहूनच असतात. मी माझा जीव धोक्यात घालून तिला मदत करण्याचे ठरविले.
मी तिला रेल्वे पोलिसांकडे (एस. आर. पी. एफ) घेऊन गेलो व परीस्थिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला योग्य ती मदत केली. पुढील तपास करून माहीती काढली. ती मुलगी वडीलांबरोबर भांडण झाल्याच्या कारणाने घर सोडून आली होती अशी माहिती समोर आली. माझा जबाब घेऊन मला पोलिसांनी जाण्यास सांगितले.
पोलीसांनी मुलीला पुढे तात्पुरते सुधारगृहात पाठवले आहे.