आपत्कालीन मदत मागण्यासाठी निशाणी

समाजात रोज कुठे ना कुठे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या विचित्र घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अनेक वेळा या घटना घडण्याच्या वेळी पीडित व्यक्ती इतरांच्या मदतीने वाचण्याची शक्यता असते. परंतु अत्याचार, धमकवणाऱ्यां व्यक्तीच्या दहशतीमुळे पीडित व्यक्ती कुणाचीही मदत घेऊ शकत नाही. अशा संकटात असलेल्या व्यक्तींना इतरांकडून मदत घेता यावी यासाठी आपत्कालीन मदतीसाठी वरील चित्रात दिला आहे निशाणा म्हणजेच आपल्या अंगठ्या जवळचे बोट फक्त वर करून दाखवावे. अशा पद्धतीची एक खून दाखवने म्हणजे ती व्यक्ती संकटात आहे असा त्याचा अर्थ होईल. अशा वेळेस संबंधित नागरिकांनी त्वरित त्या व्यक्तीजवळ जाऊन चौकशी करावी. खरोखर संकटात असेल तर हेल्पलाइन नंबर लहान मुलांचा 1098 महिलांचा 181 आणि पोलीस 112 आणि 100 अशांना फोन करून त्वरित कल्पना देणे. तसेच त्या व्यक्तीभोवती जर काही चार पाच गुंड असतील आणि ते जर त्याला त्रास देत असतील आणि ती व्यक्ती हाताचे बोट करून पुन्हा गप्प बसत असेल तर असे नागरिकांनी समजायचे की काहीतरी संकट आहे. अशा वेळेस त्या व्यक्तीचा आणि त्या संबंधित जवळच्या उपस्थित असणाऱ्या व्यक्तीचे गुगलमॅपचे लोकेशन व फोटो/ व्हिडिओ काढून शासनाने एक नवीन Whatsapp नंबर जाहीर करावा त्यावर गुगलमॅपचे लोकेशन, काढलेला फोटो अथवा व्हिडिओ त्वरित पाठवून देता येईल. ही बातमी संबंधित डिपार्टमेंटला मिळाल्या नंतर ते त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती देतील आणि त्वरित त्या व्यक्तीची त्या संकटातून सुटका होईल.
अशा पद्धतीच्या हे एक नवीन सोपं सुटसुटीत एक अभियान सुरू करण्याचा विचार आहे. तेव्हा ज्यांना ज्यांना या अभीयानांमध्ये रस आहे अशांनी संपर्क करावा तसेच शासनाने देखील या निवेदनाची योग्य ती दाखल घेवून कार्यवाही करावी. सदर अभियानाबाबत शासनाकडून देखील प्रयत्न व्हावेत म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह, महिला व बालकल्याण मंत्री तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला निवेदन दिले आहे.
● ✍️ प्रमोद झिंजाडे, अध्यक्ष, महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा






