सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजकालच्या तरुणाईचे आयुष्य होतेय उध्वस्त

सध्याच्या २१ व्या शतका मध्ये मोबाईल सोशल मीडिया चा अतिवापर हा हल्लीच्या नवीन पिढीला अतिशय धोकादायक बनलेला आहे. पाश्चात्य संस्कृती अवलंबनारी नवीन पिढी, तसेच ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा या सोशल मीडियाचा सर्वात जास्त शिकार बनत चाललेला आहे.
ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून कर्ज पाणी काढून जमिनी सावकारांकडे गहाण ठेवून आपल्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवतात. परंतु शहरातील बदलते शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता त्याचप्रमाणे सोशल मीडिया, facbook, instagram यातून होणाऱ्या तरुण-तरुणींची मैत्री. पुढे मैत्रीच रूपांतर लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये जाते व यानंतर मुली मुलांकडे लग्नासाठी तगादा लावतात परंतु लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहिल्या नंतर मुलांची पुढे लग्न करण्याची मानसिकता बदललेली असते. मैत्रीण ही प्रेयसी पर्यंत ठीक असते .परंतु लग्न करून आयुष्य काढणे. याबद्दल मुलांमध्ये कमालीचे कन्फ्युजन असते. व यामुळेच कित्येक तरुण तरूणींचे लग्नाच्या अगोदरच ब्रेकअप होतात. आत्महत्या, खून होतात
हे खूप भयानक वास्तव आहे. यातूनच फ्रस्टेशन मध्ये कित्येक मुली आत्महत्या करतात.
सुज्ञ नसलेल्या मुली नेमक्या या जाळ्यामध्ये अडकल्या जातात व स्वतःचा आयुष्य बरबाद करून घेतात.
आज विचार करायला गेले तर सध्या हे प्रमाण 60% पेक्षा जास्त आहे. विचारांची परिपक्वता नसताना घेतलेले मुलींनी चुकीचे निर्णय वेळ गेल्यावर समजून त्याचा काही उपयोग होत नाही. मग तुम्ही म्हणाल की यामध्ये आई-वडिलांनी मुला मुलींना संस्कार द्यायला हवे. होय नक्कीच वयाच्या सोळा वर्षापर्यंत जोपर्यंत मुलं-मुली आई-वडिलांच्या जवळ असतात त्यावेळेस आई-वडील त्यांना पूर्ण ज्ञान संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हीच मुलं, मुली जेव्हा उच्च शिक्षणासाठी आपल्या पालकांपासून दूर जातात तेव्हा त्या वातावरणामध्ये त्यांच्या मनावरती वेगळेच परिणाम होतात. उच्च शिक्षणासाठी आई-वडिलांपासून दूर आलेल्या मुला मुलींना शहरातील गुण लागतात व ते यानंतर शहरात असलेली संस्कृती व पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून
मित्र-मैत्रिणी जमवतात व पुढे मैत्रीच्या रूपांतर लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये होते आणि काही वर्षातच जेव्हा लग्नाचा विषय समोर येतो तेव्हा मात्र ब्रेकअप घेण्याचा निर्णय होतो.
यामुळे आज कालच्या तरुणाईने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा किंवा आपल्या पालकांचं आपल्याला जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत असणाऱ्या योगदानाच तरी भान ठेवायला हवं. सोशल मीडिया व पाश्चात्य संस्कृतीच्या मागे फरपटत जाण्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीनुसार स्वतःचे जीवन जगावं. आज कालच्या तरुणींनी सुद्धा आपला जास्तीत जास्त वेळ शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये घालवायला हवा. उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभा राहून जेव्हा स्वतःला वाटेल की आपण आता सुज्ञ झालो तेव्हाच पालकांना विश्वासात घेऊन आपल्या आयुष्याचे निर्णय घ्यायला हवे.
✍️सौ.शीला अवचर (मांगी, ता.करमाळा)







