उमरड ते पूर्व सोगाव रोडची दुरावस्था
◆ संदेश सिटीझन रिपोर्टर न्यूज ◆
समस्या – उमरड ते पूर्व सोगाव रोडची दुरावस्था झाली आहे. उजनी धरण पुनर्वसित असलेल्या पूर्व सोगाव साठी उमरड रस्ता हा एकमेव दळणवळण मार्ग आहे. मात्र हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. सोगाव, उमरड व परिसरातील ग्रामस्थांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी अत्यंत जिकरीने प्रवास करावा लागत आहे.
रस्ता हा एखाद्या भागाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना जो मनस्ताप होत आहे तो दूर करावा अशी विनंती.
समस्या सोडवण्याची अपेक्षा कुणाकडून – सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी
समस्या मांडणारे – नंद किशोर वलटे, उमरड (ता.करमाळा)
आपल्या भागातील समस्यांवर आवाज उठविण्यासाठी संदेश सिटीझन रिपोर्टर न्यूज वर माहिती नोंदवा – https://saptahik-sandesh.com/sandesh-citizen-reporter-page/