ग्रामीण भागात चांगल्या स्थितीतल्या एसटी सोडाव्यात
समस्या – करमाळा आगारातील एसटी गाड्या खूप जुन्या तसेच खराब झाल्या आहेत.या जुन्या गाड्या ग्रामीण भागाच्या फेऱ्या करण्यासाठी वापरल्या जातात. त्या कधीही आणि कोठेही बंद पडत आहेत. तसेच कधी कधी गाडी ला प्रॉब्लेम असल्याने रद्दही होतात.
या कारणाने नागरिकांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, शैक्षणिक नुकसान होत आहे. अशाच प्रकारे करमाळा-वाशिंबे मार्गावर चालणाऱ्या एसटी बस पंक्चर झालेले छायाचित्र खाली दिले आहे (दिनांक २८ सप्टेंबर २०२२)
समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – करमाळा एसटी आगार
समस्या मांडणारे – विद्यार्थी, वाशिंबे