शिवाजीनगर भागातील साचणारे पाणी व झाडाझुडुपांचा पालिकेने बंदोबस्त करावा
करमाळा शहरातील शिवाजीनगर भागात रस्त्याच्या कडेला आपोआप उगवलेली काटेरी झाडे झुडपे,काँग्रेसी, व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्यामुळे परिसर विद्रुप झालेला आहे. तसेच याच रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रहात आहे यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे.
याच मार्गावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे तसेच अनेक खाजगी शिकवण्या देखील आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठ्या प्रमाणात ये जा चालू असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याआधी नगरपालिकेने तात्काळ या झाडाझुडपांचा बंदोबस्त करून पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.