उमरड-अंजनडोह-वीट रस्त्याची झाली दैना – शासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
समस्या – उमरड-अंजनडोह-वीट हा रस्ता अतिशय खराब झाला असून यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मागच्या वेळी रस्त्याचे काम केले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने काही दिवसातच रस्त्यावरील खडी बाजूला होऊन खड्डे पडू लागले. या रस्त्याच्या कामाकडे शासनासह लोकप्रतिनिधीं चेही दुर्लक्ष आहे.
या रस्त्यावरुन उमरड, वीट, अंजनडोह व आसपासच्या गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबर या भागातील शेतकरी आपला ऊस विहाळ कारखान्याला, अंबालिका कारखान्याला याच मार्गावरून पाठवत असतात. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना मोठ्या जिकरीने गाडी चालवावी लागते. अनेकदा खड्ड्यांमुळे उसाच्या मोळ्या रस्त्यात पडतात. त्यात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. अनेक वाहनांचे नुकसान होते. छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरून गाडी चालविणे धोकादायक असते. त्यामुळे शासनाने उमरड-अंजनडोह-वीट या रस्त्याचे काम तातडीने व चांगल्या दर्जाचे करावे व लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करावा.
समस्या मांडणारे – आप्पासाहेब कोठावळे, उमरड, ता.करमाळा