चिखला-पाण्यातुन वाट काढत चिमुकल्यांची शाळा चालू

उमरड ते विहाळ या रस्त्याची फार मोठी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर उमरड ग्रामपंचायत हद्दीत कोठावळे, बदे, गुटाळ, अशा वस्त्या आहेत त्यांची दळण-वळण याच रस्त्यातून होते. आजपर्यंत ग्रामपंचायत व आमदार यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून रस्त्याचे काम झालेले नाही.
आज शाळकरी मुलांना पाण्यातून व चिखलातून जावे लागत आहे. खूप त्रास घेऊन व जीवावर उदार होऊन शाळकरी मुले, दूध घालण्यासाठी जाणारे शेतकरी, कामगार मजूर याच रस्त्याने जात आहे. त्यामुळे आता तरी उमरड ग्रामपंचायत आमदार, लोक प्रतिनिधी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी भावना या वस्तीवरील लोकांची आहे.
– ज्ञानेश्वर बदे, उमरड, ता.करमाळा
आपल्या भागातील समस्या मांडण्यासाठी ८४५९४३६३६३ या WhatsApp वर क्रमांकावर फोटोसहित तुमच्या शब्दात माहिती पाठवा.






