कोंढेज येथून पंधरा वर्षाच्या मुलीस पळवून नेले
करमाळा : पंधरा वर्षाच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे.या प्रकारची फिर्याद या मुलीच्या बहिणीने दिली आहे.
यात दिलेल्या फिर्यादीत सविता बीरसिंग पावरा ( रा. दुर्बड्या, ता. शिरपूर, जि.धुळे. / हल्ली रा. कोंढेज, ता. करमाळा) हिने म्हटले आहे, की आम्ही ऊसतोडीचे काम करत असून १७ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता आम्ही झोपलो असता माझी बहिण १५ वर्षे ५ महिने ही बाथरूमला गेली ती पुन्हा आलीच नाही. तिचा शोध घेऊन ही सापडत नाही. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.