प्रेमसंबंधावरून ब्लॅकमेलींग करून मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दांपत्याविरोधात गुन्हा दाखल -

प्रेमसंबंधावरून ब्लॅकमेलींग करून मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

0

करमाळा (दि.१०) – प्रेमसंबंधावरून ब्लॅकमेलींग करून मुलाला शारीरीक व मानसिक त्रास देवुन त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका दांपत्या विरोधात आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वडिलांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून यात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ व कलम ३(५) या अंतर्गत करमाळा पोलिसांनी दांपत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संकेत दिनकर देवकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वडील दिनकर मच्छिंद्र देवकर, रा वरकटणे, ता. करमाळा, जि. सोलापुर यांनी पोलिसांत फिर्याद दिलेली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मुलगा संकेत देवकर हा ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणुन काम करित होता. साखर कारखान्यात ऊस वाहतुक पुरवठा करणे कामी संकेत व गावातील दुसरा एक ट्रॅक्टर ड्रायव्हर एकत्रित काम करित होते. जानेवारी २०२४ पासून माझ्या मुलाचे त्याच्या घरी ट्रॅक्टरच्या कामानिमित्ताने येणे जाणे सुरू होते. माझ्या मुलाचे व त्याच्या पत्नीचे त्या निमित्ताने बोलणे-चालणे सुरू होते व यामुळे त्यांच्या मध्ये विवाहबाहय प्रेमसंबंध निर्माण झाले होते. माझा मुलगा व आरोपी क्र.१ ची पत्नी एकमेकांशी आरोपी १ च्या गैरहजेरीत भेटत असत.

त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती आरोपी क्र.१ ला माहिती झाल्यानंतर आरोपी क्र.१ व त्याची पत्नी आरोपी क्र २ या दोघांनी मिळुन संगणमत करून माझा मुलगा संकेत यास ब्लॅकमेलींग करण्यास सुरूवात केली होती व त्याला पैशाची मागणी करून त्याला शारीरीक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे माझा मुलगा संकेत हा मानसिक तणावाखाली राहत होता. त्यावेळी आम्ही त्यास विचारणा केली असता त्याने त्याचे व आरोपी क्र.२ हिचेसोबत असलेल्या प्रेमसंबधाबाबत माहिती देवुन ते दांपत्य त्याला ब्लॅकमेलींग करत असल्याचे सांगुन पैशाची मागणी करित असल्याचे सांगितले होते. त्यावेळी मी व माझे पत्नीने आरोपी क्र.१ व आरोपी क्र.२ या दांपत्याना समजावुन सांगितले होते परंतु त्यांनी आमचे काहीएक न ऐकता आम्हाला सुद्धा शिवीगाळ करून मुलास बलात्काराच्या केसमध्ये टाकेन अशी धमकी दिली होती.

त्यानंतर त्या दांपत्यानी माझा मुलगा संकेत देवकर याच्या विरोधात मार्च महिन्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता व सदर गुन्हयात मुलाला अटक होवुन साधारणत: दीड ते दोन महिन्यानंतर न्यायालयातुन जामिन झाला होता.

माझ्या मुलावरती खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतरही दांपत्या माझ्या मुलास त्रास देत होते. त्यास रस्त्यात गाठुन, शेतात येवुन “तु जर आम्हाला अजुन पैसे दिले नाही तर तुला अजुन दुस-या खोटया गुन्हयात अडकवणार आहे” अशी धमकी देत होते त्यामुळे तो जास्तच मानसिक तणावाखाली वावरत होता. आत्महत्या करण्याच्या घटनेच्या आदल्या दिवशी सुद्धा तो मला “आरोपी क्र.१ व आरोपी क्र.२ पैशासाठी जास्त त्रास देत असुन मी आत्महत्या करणार आहे “ असे बोलला होता त्यावेळी मी व माझ्या पत्नीने त्यास समजावुन सांगुन त्याचे मनपरिवर्तन केले होते परंतु तरीही माझ्या मुलाने दि ४ सप्टेंबर २०२४ रोजी घरामध्ये कोणीही नसताना घर बंद करून आत्महत्या केली. सदर दुखा:तुन आम्ही थोडेफार सावरल्यामुळे सदरची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यास आलो. या प्रकरणात पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!