दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल
करमाळा (दि.१४) – दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या दोन व्यक्तींना करमाळा पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मयूर कदम यांनी एक फिर्याद नोंदविली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,१३ सप्टेंबर रोजी पावणे अकराच्या सुमारास संगम चौक करमाळा येथे वाहतुक केसेस करत असताना समोरुन युवराज कदम वय 34 वर्षे रा.कंदर ता.करमाळा जि.सोलापूर हा व्यक्ती आपल्या ताब्यातील मोटार सायकल (मोटारसायकल नंबर एम. एच. 45 एक्स 3631) अडखळत चालवत येत असताना दिसला त्यावेळी चौकशी केली असता ती व्यक्ती दारू पिली असल्याचा संशय आला त्यानंतर आम्ही दोन पंचासमक्ष ब्रेथ एनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता त्याची तपासणी पॉझिटिव्ह आली म्हणून या व्यक्तीचे विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
दुसरी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की १३ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ च्या सुमारास करमाळा शहरात गणपती विसर्जन मिरवणूक बंदोबस्त करत असताना अभिजीत मेडिकल समोर शेखर संजय घाडगे वय 29 वर्षे रा. तरटगाव ता. करमाळा ही व्यक्ती त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 12 व्हि. ए. 4728) दारु पिउन चालवताना आढळला. त्यानंतर आम्ही दोन पंचासमक्ष ब्रेथ एनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता त्याची तपासणी पॉझिटिव्ह आली म्हणून या व्यक्तीचे विरोधात फिर्याद दाखल केली आहे.