चौदा वर्षाची मुलगी बाळेवाडी येथून पळाली
करमाळा : चौदा वर्षाची मुलगी बाळेवाडी येथे राहत असताना रात्रीच्या अंधारात पळून गेली आहे. याप्रकरणी तिच्या आईने पोलीसात तक्रार दिलेली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की माझी १४ वर्षाची मुलगी बाळेवाडी येथे राहत असलेल्या माझ्या वडिलांकडे रहावयास होती. १७ फेब्रुवारीला रात्री ती अचानक बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेऊनही सापडली नाही. त्यामुळे तिला कोणीरी अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.