मद्य प्राशन करून ट्रक चालविणाऱ्या विरूध्द कारवाई
करमाळा (दि.२३) – मद्यप्राशन करून करमाळा शहरातून २२ चाकी ट्रेलर घुसविणाऱ्या चालकाविरूध्द पोलीसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार १७ ऑक्टोबरला सायंकाळी साडेनऊ वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक प्रदीप रामेश्वर जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की १७ ऑक्टोबरला सायंकाळी साडेनऊच्या सुमारास करमाळा शहरात २२ चाकी माल वाहतूक करणारा ट्रेलर चेनराम मोहन मीना (रा. उदयपूर, राजस्तान) याने घुसविला. ही माहिती समजताच आम्ही करमाळा शहरात फुलसौंदर चौकात गेलो असता, सदरचा चालक हा मद्य प्यायलेला होता. त्याची ब्रेथ एनालयाझर मशिनद्वारे टेस्ट केली असता, ती पॉझीटीव्ह आलेली आहे.या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.