कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन – आंदोलकांची ताठर भूमिका – दिग्विजय बागलांसह ४२ जणांवर गुन्हे दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा – अहमदनगर राज्यमहामार्गावर एकत्र जमून कुकडी धरणाचे पाणी मांगी तलावात सोडलेच पाहिजे, नाहीतर कोणत्याही परिस्थीतीमध्ये आम्ही येथून उठणार नाही या मागणीनंतर आंदोलकांनी ताठर भूमिका घेतल्याने करमाळा पोलिसांनी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस कॉन्सटेबल शरद दत्तू साळवे बक्कल यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, आज (ता.१७) करमाळा – अहमदनगर राज्यमहामार्गावर एकत्र जमून कुकडी धरणाचे पाणी मांगी तलावात सोडलेच पाहिजे, या मागणीसाठी जवळपास १५० लोकांनी सकाळी 11.30 ते 12:30 वा. एकत्र जमून कुकडी धरणाचे पाणी मांगी तलावात सोडलेच पाहिजे, अन्यथा आम्ही येथून उठणार नाही याप्रमुख मागणीसाठी ताठर भूमिका घेतली, त्यामुळे जिल्हाधिकारी सो सोलापुर यांचे १० ऑगस्टचे जमावबंदीचे आदेशाचे उल्लंगन करून बेकायदेशीर जमाव जमुन प्रतिबंध केला आहे, शासकिय अधिकारी यांचे वाजवी आदेश पालन केले नाही तसेच रस्त्याने जाणारे येणारे रोडवरील वाहने, पायी जाणारे लोकांना जाण्यास अडथळा प्रतिबंध केला म्हणून कलम 341, 188 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे आदेशाने पोलिस हेडकॉन्सटेबल रणदिवे यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेली नावे… 1) दिग्वीजय दिगंबर बागल वय-27 वर्षे रा. मांगी 2) आदेश दत्तात्रय बागल वय-27 वर्षे रा. मांगी 3) निखिल प्रकाश बागल वय-55 वर्षे रा. मांगी 4) धीरज दत्तात्रय बागल रा. मांगी 5) सुभाष कोंडीबा बागल वय 54 वर्षे रा. मांगी 6) महादेव शिवाजी अवचर वय 60 रा. मांगी 7) शिवाजी दादा जाधव वय 25 वर्षे रा. वडगाव) 8) किशोर बाळासाहेब बागल व्य-30 वर्षे रा. मांगी 9) आबासाहेब अडसुळ वय-32 वर्षे रा. हिवरवाडी 10) नवनाथ किसन सुरवसे वय-56 वर्षे रा. मांगी 11) तात्या बागल रामांगी 12 ) प्रितम अवचर रा. मांगी 13) चंद्रकांत मच्छिद्र बगल वय-55 वर्षे रा. मांगी 14) हरिश्चंद्र आनंदा झिंझाडे वय 41 वर्षे रा. पोथरे 15) अशोक रेवनानाथ शिंदे वय 35 वर्षे रा. पोथरे 16) पुरुषोत्तम किसन नरसाळे वय-45 वर्षे रा.मांगी 17) बाप्पासाहेब पोपट शिंदे वय-39 वर्षे रा. पोथरे 18) पद्माकर बाळलाल संचेती वय 60 वर्षे रा. मांगी 19) राजेंद्र भागवतराव बागल वय-51 वर्षे रा. मांगी 20) दत्तात्रय मच्छिंद्र बागल वय-55 वर्षे रा.मागी 21] नवनाथ किसन सुरवसे वय-50 वर्षे रा. मांगी 22 ) प्रदिप जालिंदर भोसले वय-34 वर्षे रा. मांगी 23) समाधान तुकाराम कडवकर वय 27 वर्षे रा.मांगी 24) अमित अंबादास बगल वय 40 वर्षे रा. मांगी 25) सौरभ दिलीप बागल वय-28 वर्षे रा. मांगी 26) उध्दव मच्छिंद्र बागल वय-50 वर्षे रामांगी 27) बापु उत्तम ननवर वय-48 वर्षे रा. मांगी 28) सतिश परशुराम रोडगे वय 40 वर्षे रा. वडगाव (द) (29) शिवाजी गणपत जाधव वय-25 वर्षे रा. वडगाव (उ) 30) शिवाजी ज्ञानदेव बंडगर वय-58 वर्षे रा. ढोकरी 31]प्रविण दराडु भांडवलकर वय 25 वर्षे रा. मांगी 32) किरण शरद क्षिरसागर वय 23 वर्षे रा. मांगी 33) अनिल वामन इटकर वय-32 वर्षे र हिवरवाडी 34) उदय सुभाष बागल वव- 36 वर्षे रा. मांगी 35) प्रितम लहु अवचर दय-25 वर्षे रामांगी 36) तात्यासाहेब हरीभाउ दाहाल वय 45 वर्षे मांगी 37) नवनाथ बलमीम दागलय 47 वर्षे रा. मांगी 38) तुषार बाळासाहेब बागल वय 40 वर्ष रा. मांगी 39) सुभाष जीजाबा बागल वय-48 वर्षे रा. मांगी 40) दिनेशदास मांडवकर वय-55 वर्षे वडगाव (द) 41) शिवशंकर दशरथ जगदाळे वय 42 वर्षे रा. वडगाव (द)
42)चिंतामणी नामदेवराव जगताप वय-48 वर्षे रा. करमाळा.