दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न एका विरुध्द गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता. ९: दोन समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मिडीयावर वक्तव्य करणाऱ्या विरुध्द करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी येथील फंडगल्लीतील सागर फंड यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले,की ४ मार्च ला रात्री साडे दहा वाजता मी माझे इंस्टाग्रामवर पहात असताना, करमाळा येथील स्वप्नील कांबळे यांने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्या विरूध्द फिर्याद देत आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी श्री. कांबळे याच्या विरुध्द भारतीय दंड संहितेचे कलम २९५ऐ व ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विनायक माहुरकर हे करत