ऊसाचा ट्रॅक्टर नेण्यावरून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जाण्यावरून खडकी (ता. करमाळा) येथे दोघाजणांनी एकास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली आहे. हा प्रकार २२ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजता झाला आहे. यात माधव नाना नागटिळक रा. खडकी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २२ फेब्रुवारीला माझ्या शेतातील ऊस तोडणीसाठी ट्रॅक्टर आला असता, नानासाहेब कोरबा खरात व राहूल नानासाहेब खरात या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या शेतातून ट्रॅक्टर न्यायचा नाही असे म्हणून लाथा-बुक्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप अधिक्षक डॉ. विशाल हिरे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!