मोटारसायकलची समोरासमोर धडक-वादातून युवकावर हल्ला -

मोटारसायकलची समोरासमोर धडक-वादातून युवकावर हल्ला

0

करमाळा, ता.१६: बिटरगाव (सांगवी), ( ता.करमाळा)येथे मोटारसायकलची  समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातानंतर  झाल्यानंतर झालेल्या वादातून अल्पवयीन मुलास मारहाण झाली आहे. ही घटना दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास महादेव डोंगरे यांच्या शेताजवळील रस्त्यावर घडली आहे.
या प्रकरणी शिवाजी हरिदास डोंगरे (वय ४२,रा. बिटरगाव (सांगवी), ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.


त्यात त्यांनी म्हटले की, ते आपला मुलगा शंभुराजेसह मोटारसायकलवरून शेताकडे जात असताना समोरून येणाऱ्या विजय कुंडलिक बसले (रा. बिटरगाव (सांगवी) यांच्या मोटारसायकलशी त्यांची धडक झाली. या धडकेनंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने शिवीगाळ करत काठीने त्यांच्या मुलाच्या पाठीवर, तोंडावर व पायावर मारहाण केली. तसेच जवळ पडलेला दगड उचलून मुलाच्या डोक्यावर मारून जखमी केले.जखमी मुलास तातडीने उपचारासाठी टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आसून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!