शेळ्या व बोकड घेऊन सालगडी रात्रीत फरार

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – शेतात कामाला ठेवलेल्या सालगड्याने पाच शेळ्या व तीन बोकडे घेऊन फरार झाला असल्याची तक्रार खडकेवाडी (ता. करमाळा) येथील शेतकरी महिलेने करमाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.

नंदाबाई रावसाहेब शिरसट(वय – 63 वर्ष), रा.खडकेवाडी, ता.करमाळा, जि. सोलापूर यांनी करमाळा पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, आमच्या शेतात गेल्या सहा महिन्यांपासून तुषार प्रकाश नामदास रा. जाधववाडी, ता.जि.सातारा यांस सालगडी म्हणुन कामास ठेवलेले होते. माझ्या कडे ५ शेळ्या व ३ बोकडे होते ते देखील तोच सांभाळत होता. माझ्या शेळ्या मी नेहमी माझे शेतातील उघड्या शेडमध्येच ठेवत असे. तुषार हा मागील सहा महिन्यांपासुन शेळ्या व बोकडे यांचा चारा पाणी व देखभाल नियमीतपणे करत होता. माझा सालगडी
हा आमचे शेतामधे रहात होता. व मी खडकेवाडी गावात रहात आहे. दिनांक 04/10/2023 रोजी सकाळी 06/00 वाजण्याचे सुमारास मी माझे शेतामधे गेले. तेथे मी
शेतातील थोडेफार काम केले. तेथे आमचा सालगडी तुषार हा देखील माझेबरोबर मला कामात हातभार लावत होता. सायंकाळी 05/00 वाजपर्यत मी शेतामधे काम केले व गावातील घरी निघुन आले. सालगडी शेतातील शेडवरच तो रहात असलेल्या खोलीमधे नेहमीप्रमाणे राहीला. मी जाताना माझ्या शेळ्या व बोकडे माझे उघड्या शेडमधेच होत्या.

रात्री मी घरीच मुक्काम केला. दुस-या दिवशी दिनांक 05/10/2023 रोजी सकाळी 06/00 वाजण्याचे सुमारास मी नेहमीप्रमाणे माझे शेतामधे गेले. तेव्हा तेथे मला माझे उघड्या शेडमधे माझ्या शेळ्या व बोकडे
दिसले नाहीत. तेव्हा मी आमचा सालगडी तुषार प्रकाश नामदास हा रहात असलेल्या रुमकडे गेले असता तेथे मला त्याची रुम उघडी दिसली. तेव्हा मी आत जावुन पाहीले असता मला तो व त्याचे सामान देखील रुम मधे दिसले नाही. तेव्ही मी त्याचा आमचे शेतामधे इतररत्र शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.

तसेच मी माझे शेळ्या व बोकडांचा देखील शेतामधे व आजुबाजुचे परिरसात शोध घेतला परंतु त्या देखील मला कोठेही आढळुन आल्या नाहीत. म्हणुन मी सालगडी तुषारच्या मोबाईल नंबर वर फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. मी त्याचेशी वारंवार आज पावेतो संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा संपर्क होवु शकला नाही. माझ्या शेळ्या व बोकडे तुषार प्रकाश नामदास यानेच चोरुन नेल्याची माझी खात्री झाल्याने मी आज पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यास आले. या ५ काळ्या रंगाच्या शेळ्या ३० हजार किंमतीच्या असून काळ्या रंगाचे ३ बोकड ३० हजार रुपये अंदाजे किंमतीचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!