घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने रात्रीत केली लंपास
करमाळा (दि.३०) – घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने रात्रीत लंपास केली असल्याची घटना जेऊर येथे घडली आहे. या संदर्भात राहुल श्रीरामे यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक १६ नोव्हेंबर ला रात्री १० वा. माझी हिरो होंडा एचएफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक MH45AA1473 ही आमच्या घरासमोर हँन्डल लाँक करून लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वा चे सुमारास उठल्यानंतर गाडी पाहिली असता ती लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. त्यानंतर आम्ही घरातील सर्वांनी मिळुन घराजवळ, जेऊर गावात तसेच परिसरात शोध घेतला परंतु मो. सायकल मिळुन आली नाही. त्यामुळे आमची खात्री झाली की आमची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.