घरासमोरील मोटारसायकलची चोरी.. -

घरासमोरील मोटारसायकलची चोरी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरट्यांनी चोरी केली आहे. हा प्रकार ४ फेब्रुवारीला मध्यरात्री करमाळा येथील नालबंदनगर मध्ये घडला आहे. यात कादर मौला दाळवाले (रा. नालबंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या मालकीची मोटारसायकल हिरोहोंडा स्प्लेंडर क्र. एमएच ४५ जे ८५७९ ही ४ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास नालबंद नगर येथील माझ्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले असता, माझी मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत गायकवाड हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!