सावकाराच्या त्रासास कंटाळून नसीर पठाण यांची आत्महत्या..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : सावकाराच्या त्रासास कंटाळून वरकुटे (ता. करमाळा) येथील नसीर इलाही पठाण यांनी विषारी औषध घेवून आत्महत्या केली आहे. हा प्रकार २० फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता घडला आहे. यात अजरोद्दीन नसीर पठाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या वडीलांनी अंकुश केरबा हांडे यांच्याकडून एक लाख रूपये तीन टक्के व्याजाने घेतले होते. तसेच दोन लाख असे एकूण तीन लाख रूपये घेऊन त्यांना गट नं.१५४ पैकी ९६ आर ही जमीन त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी करून दिली होती. तरीही ते वारंवार पैशासाठी शिवीगाळ व दरमदाटी करत होते. प्रविण खोचरे (कन्हेरगाव), विजय डोबळे, सागर डोबळे, बाळासाहेब डोबळे (रा. भोगेवाडी, ता. माढा) व हांडे व त्यांचा मुलगा महादेव हंडे व सुंदर हंडे यांनी वारंवार धमकी देऊन अमपानित केल्याने माझ्या वडीलांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.