निंभोरे येथे भरदिवसा दोन लाखांची चोरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – निंभोरे (ता.करमाळा) येथे २९ सप्टेंबर रोजी दुपारी भरदिवसा घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात घुसून २ लाखांचा ऐवज चोरला आहे.
अमित लक्ष्मण मारकड यांनी या संदर्भात करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही निंभोरे येथील मारकड वस्तीवर राहायला आहे. शुक्रवारी दि २९ सप्टेंबर रोजी २ च्या सुमारास मी वडिलांना सोडविण्यासाठी जेऊर रेल्वे स्टेशन वर गेलो होतो. माझी आई घराचा दरवाजा लोटून घराच्या बाजूला जनावरांसाठी गीन्नीगोल गवत काढत होती. दूपारी ३ च्या सुमारास घरातून २ अनोळखी व्यक्ती घराबाहेर पडताना आईला दिसले. ती तातडीने घराकडे गेले असता,तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच लाकडी कपाटामध्ये ठेवलेले साडे तीन तोळयाचे सोन्याचे गंठण व दिड त़ोळयाचे मिनी गंठण असे मिळून दोन लाखाचे दागिने गायब होते.
घरात शिरलेल्या या अज्ञात चोरट्यांनी १,४०,००० रुपये किंमतीचे साडे तीन तोळयाचे सोन्याचे गंठण व ६० हजार रुपयांचे दिड त़ोळयाचे मिनी गंठण असे मिळून दोन लाखाचे दागिने या चोरट्यांनी चोरून नेले असल्याची तक्रार मारकड यांनी फिर्यादीत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.


