केम येथील चंदूमती दोंड यांचे निधन
केम (संजय जाधव) – केम येथील वारकरी संप्रदायातील चंदूमती दगडू दोंड यांचे आज (दि. १८) वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ८० होते. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे
त्या श्री उत्तरेश्वर छबीना रांगोळी ग्रुपच्या संस्थापिका होत्या. पोस्टमन राजेंद्र दगडू दोंड यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.