करमाळा येथील सत्यभामा देशमुख यांचे निधन

करमाळा (दि.१६) – करमाळा येथील सत्यभामा वसंतराव देशमुख (वय ७५) यांचे रविवार दि. १५ रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. रविवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजता टेंभुर्णी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे २ मुले, २ मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक कैलास देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.




