करमाळा येथील शिवाजीराव मोरे गुरुजी यांचे निधन

करमाळा (दि.२७) – करमाळा शहरातील महेंद्रनगर मधील शिवाजीराव नामदेव मोरे (गुरुजी) यांचे आज शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी.१:३० वा. निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९१ होते.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर करमाळा येथील दत्तमंदिरामागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. करमाळा तालुक्यातील कात्रज हे त्यांचे मूळ गाव होते. मोरे गुरुजी विद्यार्थी प्रिय व कडक शिस्तीचे आदर्श शिक्षक म्हणून तालुक्यात परिचित होते .ग्रामीण भागात वाचनाची सवय लागावी यासाठी गुरुजींनी कात्रज येथे वाचनालय सुरू केले होते.