करमाळा येथील द्रौपदी माने यांचे निधन

करमाळा : कानाडगल्ली येथील द्रौपदी शिवदास माने (वय-८३) यांचे वृध्दपकाळाने काल (ता. ६) सकाळी सव्वाअकरा वाजता राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या मागे पाच मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची दोन मुले शिक्षक, एक मुलगा करमाळा आगार येथे वाहतूक नियंत्रक तर दोन सुना शिक्षिका आहेत. ग्रामसुधार समितीच्या वतीने त्यांना आदर्श माता हा पुरस्कार देण्यात आला होता. न. पा. शाळा नं. ४ चे शिक्षक संतोष माने यांच्या त्या मातोश्री आहेत