पंचायत समितीच्या माजी सदस्या शारदाताई नवले यांचे निधन

करमाळा(दि.२६): केतुर नंबर २ येथील रहिवासी व करमाळा पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ शारदाताई देवराव नवले यांचे आज (दि.२६) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या त्यांच्यावरती उपचार चालू असताना त्यांचे आज निधन झाले आहे. मृत्यू समयी त्या ६१ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. शारदाताई नवले या पंचायत समितीच्या माजी सदस्य म्हणून दोन वेळा निवडून आलेल्या होत्या. केतुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच देवराव नवले यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





