माजी पोलिस पाटील पोपट नरसाळे यांचे निधन

करमाळा : पुनवर येथील ज्येष्ठ नागरिक आणि माजी पोलिस पाटील पोपट मारुती नरसाळे (वय ९५) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पोपट नरसाळे यांनी तब्बल ४० वर्षे पुनवर गावचे पोलिस पाटील म्हणून निष्ठेने व जबाबदारीने काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावातील शांतता आणि एकोपा टिकविण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांचे ते त्यांचे वडील होते.
