केम येथील बागायतदार गोरख तळेकर यांचे निधन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील प्रसिद्ध बागायतदार गोरख नारायण तळेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८३ होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे.
त्यांचा केम परिसरातील सर्व घटकांशी संबंध होता. ते आण्णा नावाने सर्वांना परिचित होते. त्यांच्या निधनाने केम व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्यविधीला सर्व क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.
