इंदुमती शहापूरे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील इंदुमती दामोदर शहापूरे यांचे अल्पशा आजाराने ९ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पाश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. इंदुमती शहापूरे ह्या जेऊर येथील प्रसिध्द व्यापारी मुरलीधर शहापूरे आणि नागनाथ शहापूरे यांच्या आई होत. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.