नागनाथ गव्हाणे यांचे निधन

केम (संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील नामांकित पैलवान नागनाथ दत्तात्रय गव्हाणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ७३ होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सूना नातवंडे असा परिवार आहे.
पैलवानकीच्या कारकिर्दीत गव्हाणे यांनी अनेक फड गाजवले होते. त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







