सेवानिवृत्त प्राध्यापक महादेव कांबळे यांचे निधन

करमाळा (दि.८): यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक महादेव कांबळे यांचे आज (दि.८) पहाटे झोपेतच हृदयविकाराने निधन झालेले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कॉमर्स विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची महाविद्यालयात ओळख होती. माढा तालुक्यातील पिंपळखुंटे हे त्यांचे मूळ गाव असून करमाळा येथील शिवाजीनगर भागात ते राहण्यास होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






