सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र तळेकर यांचे निधन

केम (संजय जाधव)– करमाळा तालुक्यातील केम येथील माजी शिक्षक रामचंद्र गेनबा तळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते डॉ. अंकुश तळेकर यांचे वडील होते.
रामचंद्र तळेकर हे शिस्तबद्ध शिक्षक म्हणून परिचित होते. दहिगाव, वडशिवणे, सातोली आणि पवार वस्ती येथे सेवेत असताना त्यांनी सायकलवरून ये-जा करत आपली शिक्षकाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. तळेकर यांच्या निधनाने केम व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
