पोथरे येथील संपत ठोंबरे यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३:पोथरे येथील संपत नामदेव ठोंबरे उर्फ आप्पा (वय- 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्यामागे तीन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
पोथरे ग्रामस्थांमध्ये अतिशय मनमिळावू व दिलदार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती ते नेहमी हास्यविनोदात रमलेले असायचे. गावातील महत्त्वाच्या निर्णयात त्यांच्या सहभाग असायचा.आयुष्यभर कष्ट करून सचोटीने जिवन जगले. त्यांच्या जाण्याने पोथरे ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
पोथरे ग्रामपंचायतचे माजी सदस्य आबासाहेब ठोंबरे, शनैश्वर पाणी वापर संस्थेचे सचिव बाळासाहेब ठोंबरे , व शेतकरी ईश्वर ठोंबरे
यांचे ते वडील होते.आज( ता.१३) दुपारी 12 वाजता ठोंबरेवस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
