निंभोरे येथील शांताबाई लुणावत यांचे निधन -

निंभोरे येथील शांताबाई लुणावत यांचे निधन

0



करमाळा(संदेश प्रतिनिधी) : निंभोरे (ता. करमाळा)  येथील  शांताबाई पन्नालाल लुणावत (उर्फ काकी)  यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या समाजवादी नेते व बाजार समितीचे माजी सभापती कै.पन्नालाल लुणावत यांच्या पत्नी  होत्या. तसेच करमाळा वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुखलाल लुणावत यांच्या  मातोश्री व शासकीय अभियोक्ता ॲड. सचिन लुणावत यांच्या आज्जी होत.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांचे निधन काल (दि. 24) सायंकाळी झाले. आज ( ता.25) सकाळी दहा वाजता निंभोरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते. करमाळा वकील संघाने श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!