सिताराम गाडे यांचे निधन

करमाळा (दि.११): करमाळा येथील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री सिताराम जालिंदर गाडे वय 79 यांचे काल सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी काल सोमवार दिनांक 10 मार्च रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे मूळ गाव मलठण, जिल्हा अहिल्यानगर येथे करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुलं ,नातवंडे ,सुना , असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






