लव्हे येथील श्रीराम पाटील यांचे निधन - Saptahik Sandesh

लव्हे येथील श्रीराम पाटील यांचे निधन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : लव्हे (ता.करमाळा) येथील श्रीराम गोविंदराव पाटील यांचे आज (दि.५) पहाटे पाच वाजता आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय वर्ष ६० होते.

त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे ते बंधू होते. त्यांच्या निधनाने करमाळा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!