सांगवीचे माजी सरपंच सूर्यभान हिवरे यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सांगवी (ता.करमाळा) गावचे माजी सरपंच सूर्यभान माणिक हिवरे (नाना) यांचे दि.७ जून रोजी निधन झालं आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले, सुना, दोन मुली व नातवंड असा परिवार आहे.

स्व. सूर्यभान हिवरे यांनी दोन पंचवार्षिक मध्ये सांगवी गावचे सरपंच पदावर काम केले आहे. याचप्रमाणे दोन पंचवार्षिक मध्ये सांगवी विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेची अनेक कामे केली होती. त्यांच्या अंत्यविधी समयी सांगवी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्व. सूर्यभान हिवरे यांच्यावरील लेख – मरावे परी किर्ती रुपी उरावे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!