केम येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम देवकर यांचे निधन

केम (संजय जाधव) – केम येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम सिताराम देवकर (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने केम व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची शिक्षक म्हणून सेवा सन १९७२ मध्ये मांडवा (ता. वाडा, जि. ठाणे) येथे सुरू झाली. तेथे त्यांनी ९ वर्षे कार्यरत राहून नंतर बदलीने वडशिवणे (ता. करमाळा) येथे हजर झाले. त्या ठिकाणी त्यांनी सलग २५ वर्षे सेवा बजावत २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शिक्षक काळात त्यांनी शैक्षणिक कार्यात विशेष योगदान दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले आहेत.
वडशिवणे गावात त्यांनी उत्कृष्ट व समर्पित कार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल स्थानिक पातळीवर त्यांचे नेहमीच कौतुक झाले.
ते कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख, श्री उत्तरेश्वर प्राथमिक शिक्षक सोसायटीचे सचिव श्री. साईनाथ तुकाराम देवकर यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.