उमा शिंदे यांचे निधन

करमाळा(दि.२७): येथील किल्ला विभाग राहत असलेल्या सौ. उमा पोपट शिंदे (वय-४५) यांचे अल्प आजाराने आज (ता. २७) पहाटे पाच वाजता राहते घरी निधन झाले आहे.
पांडे येथील वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र जाधव यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या विवाहानंतर त्यांना एक मुलगा झाला व त्यानंतर त्यांना अपंगत्व आले होते. त्यानंतर तब्बल २५ वर्षे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांची विशेष सेवा केली. असे असूनही अल्प आजारात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. करमाळा शहरातील विकासनगर परिसरातील स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोथरे येथील सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नायकोडे यांच्या त्या भाची होत्या.





