नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

करमाळा : श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका सुनिता देवी होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सौ देवी यांनी मुलांना वेळेचे नियोजन कसे करावे , उत्कृष्टरित्या पेपर कसा सोडवावा तसेच भविष्यात आपण आपल्या शाळेचे व आई-वडिलांचे नाव कसे उज्वल करू शकतो याविषयी मुलांना सांगितले. मुलांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा ही दिल्या.
इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेश केलेल्या दिवसापासून आत्तापर्यंत त्यांना आलेले अनुभव कसे होते याविषयी आपली मनोगते व्यक्त केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहिते मॅडम , सौ ढाळे मॅडम, देशमाने मॅडम,सौ शेटे मॅडम ,सौ बागल मॅडम ,श्री इवरे सर यांनीही त्यांना मुलांसोबत आलेले अनुभव व्यक्त केले तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा ही दिल्या. दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेला गिरधरदास जी देवी यांची फोटो फ्रेम भेट म्हणून दिली. तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा म्हणून रायटिंग पॅडचे वाटप केले. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते व यांनीही मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी युक्ता लुंकड हिने केले तर आभार प्रदर्शन श्रुती जगताप हिने केले.