दिगंबरराव बागल विद्यालय, कुंभेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा -

दिगंबरराव बागल विद्यालय, कुंभेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0

करमाळा (दि. 23):शासनाच्या निर्देशानुसार आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथे दिनांक २१ जून रोजी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला तसेच यंदाची “योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ” ही संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

क्रीडा विभागप्रमुख विष्णू पोळ यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करवून घेतली, तर शिक्षक कल्याणराव साळुंके यांनी अष्टांगयोग आणि प्राणायामाचे महत्त्व विशद करत सूक्ष्म हालचालींचे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमात आकांक्षा क्षीरसागर, सोहम सुरवे आणि प्रशांत गायकवाड या विद्यार्थ्यांनीही योगासने सादर करत इतरांसाठी प्रेरणा ठरली.

कार्यक्रमास मुख्याध्यापक पाटील सरांसह शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी “नियमित योग सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्रअखेरीस विशेष सन्मान करण्यात येईल,” असे जाहीर करून विद्यार्थ्यांना नियमित योगाची सवय लावण्याचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!