जि.प.मलवडी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

जि.प.मलवडी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जनता सहकारी बँक कुर्डूवाडी चे चेअरमन माननीय दिलीप दादा तळेकर , जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनानंतर भन्नाट कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथील बालचमुंनी सुंदर अदाकारी करत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. मलवडी ग्रामस्थांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकांनी मनापासून आपल्या पाल्याचं कौतुक केलं. चित्रपट गीते,नाटके ,उखाणे,लावणी,देशभक्तीपर गीते,डीजे गाणी, मराठी हिंदी गाणी यांसारख्यां नृत्य -नाट्य कलांचा सदाबहार ,रंगतदार अनोखा शालेय कार्यक्रम ,स्नेहसंमेलन व कलाविष्काराचा दिमाखदार सोहळा शांततेत पार पडला!

उपस्थित सर्वजण मुलांचे कलागुण पाहून मंत्रमुग्ध झाले. बक्षीसरुपी कौतुकाची थाप सर्वांनी पाठीवर टाकली.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास केम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महेश्वर कांबळे,कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर, माजी सभापती शेखर तात्या गाडे, रमेश पवार,सागर पवार प्रहार संघटना, गणेश पप्पू कोंडलकर प्रहार जिल्हा उपाध्यक्ष, नामदेव पालवे प्रहार तालुका संघटक, प्रवीण मखरे पत्रकार,सरपंच सौ बायडाबाई सातव, उपसरपंच दुर्गुळे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , राघू कोंडलकर तंटामुक्त समिती अध्यक्ष ,सचिन पाटील तंटामुक्त उपाध्यक्ष, पोलीस पाटील प्रतिनिधी अमोल दशवंत, बाळासाहेब जाधव, चंद्रभान भैरु

पालवे ,कांतीलाल उद्धव पालवे, विनोद जाधव, कल्याण सातव, सतीश कोंडलकर ,नितीन दादा पालवे ,सुनील पालवे गुरुजी, शरद पालवे , अण्णा महाराज गुरव, कांतीलाल मेंढे, शिवाजी कोळी, आदी सर्व पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. सदर स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र पालवे, उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, भैरू दुर्गुळे, भरत सुरवसे, योगेश पालवे, प्रवीण पालवे, बाळासाहेब पालवे, नितीन बादल, किरण देडगे, अविनाश कोळी, सतीश लवळे आदी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , मुख्याध्यापक शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय रंदवे सर, साईनाथ देवकर यांनी केले व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर आभार देवकर यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!