दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेत नागनाथ मतिमंद विद्यालयात दिव्यांग दिन साजरा

केम(संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालयात ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी दत्तात्रय कुलकर्णी हे होते. या दिनानिमित्त मुलांच्या क्रीडा स्पर्धा व मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या या खेळामध्ये धावणे, लांब उडी, सॉफ्टबॉल थ्रो, रिंग मधून बॉल टाकणे या विविध स्पर्धांमध्ये मुलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला. या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या मुलांना कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी शाळेविषयी श्रीमती जाधव यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या भाषणातून दिव्यांग मुलाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चव्हाण यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री नाळे यांनी आभार मानले.




