केम केंद्राची शिक्षण परिषद केंद्रशाळा संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जुलै २०२३ या महिन्याची केम केंद्राची शिक्षण परिषद केंद्रशाळा केम या ठिकाणी संपन्न झाली. या शिक्षण परिषदेसाठी केम केंद्रातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळांचे सर्व शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेचे उद्घाटन केम गावचे माजी उपसरपंच नागनाथ तळेकर, केंद्रीय मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चट्टे व केंद्रप्रमुख महेश कांबळे यांच्या हस्ते सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.
यावेळी परिपाठ केंद्रशाळा केम मधील सर्व शिक्षकांनी उत्कृष्टपणे घेतला. प्रस्तावना – केंद्रप्रमुख श्री महेश्वर कांबळे सर यांनी केली. . शिक्षण परिषदेविषयी माहिती.विविध विद्यार्थी लाभाच्या योजनां पुस्तके सर्व शाळांना वितरित करण्यात आली . सेतू अभ्यास याविषयी माहिती सांगून पूर्व चाचणी व उत्तर चाचणी याच्यातील फरक पाहून मार्गदर्शन करण्याविषयी माहिती सांगितली. नवीन पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानावरती काय नोंदी विद्यार्थ्यांनी करावयाच्या आहेत ,याविषयी मार्गदर्शन केले . केंद्रामध्ये नवीन आलेल्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शाळा सिद्धि – या विषयावरती मंगेश सोलापुरे यांनी मार्गदर्शन केले. केंद्रातील सर्व शाळा A श्रेणीमध्ये आलेल्या आहेत त्याबद्दल सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. PGI याविषयी रेवन्नाथ देवकर यांनी उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले व 70 इंडिकेटर्स समजावून सांगितले.Let’s Change (स्वच्छता मॉनिटर )याविषयी अमोल टोणे यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपले अनुभव कसे सोशल मीडियावर अपलोड करावेत याविषयी मार्गदर्शन केले.
तंबाखूमुक्त शाळा – याविषयी प्रताप भोसले यांनी माहिती सांगितली. केंद्रातल्या 15 शाळा तंबाखूमुक्त झालेल्या आहेत व 6 शाळा राहिलेल्या आहेत त्या शाळांना पंधरा दिवसात तंबाखूमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा – याविषयी श्रीमती सुरेखा चौरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली. नवीन शैक्षणिक धोरण 2020(NEP)- याविषयी श्रीमती राणी सातव यांनी अभ्यासपूर्ण अशी माहिती सांगून या शैक्षणिक धोरणाचा आराखडा 5+3+3+4 स्पष्ट करून सांगितले. निपुण भारत FLN – याविषयी तुकाराम तळेकर यांनी भाषा व गणित पेटी चा वापर याविषयी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेचा समारोप – केंद्रीय मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चट्टे यांनी आभार मानून केला.