केम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला माजी विद्यार्थ्यांनी इन्व्हर्टर दिले भेट
केम(प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेला या शाळेतील सन १९७६ मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचने दर्जेदार कंपनीचे इन्व्हर्टर, बॅटरी साहित्य भेट दिले आहे.
या वेळी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे कालिदास तळेकर, श्री.बोंगाळे , श्री.लोंढे , आदिनाथ जाधव, कुंडलिक खानट, चव्हाण गुरुजी यांनी मनापासून सहकार्य केले. श्री. बोंगाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय सोलापूरे, सदस्य दिपक तळेकर, सर्व शिक्षक, उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम तळेकर यांनी केले, तर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करून शाळेला इन्व्हर्टर बॅटरी उपलब्ध करून दिली या बद्दल मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वसंत चटे यांनी कौतुक करुन सर्वांचे आभार मानले.